काळूस्ते सोसायटी संचालकपदी “प्रहार”चे सुरेश शिंदे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

इगतपुरी तालुक्यात सहकार क्षेत्रात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या काळूस्ते आदिवासी सहकारी सोसायटी निवडणुकीत सुरेश शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. याद्वारे इगतपुरी तालुक्यात प्रथमच प्रहार संघटनेने सहकार क्षेत्रात पाऊल टाकून  प्रथमच इगतपुरी तालुक्यात आपले खाते उघडले.

सुरेश शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्धल इगतपुरीचे आमदार आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार निर्मला गावित, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, विष्णु पाटील वारुंगसे, रमेश गावित, बाळासाहेब वालझाडे, पांडुरंग वारुंगसे, बाळासाहेब भगत, सुनील जाधव, तानाजी जाधव, रोहिदास गोवर्धने, अनिता घारे, शिवानी घारे, रवि रायकर, ज्ञानेश्वर घारे यांनी अभिनंदन केले. प्रहार दिव्यांग संघटना इगतपुरी तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, उपाध्यक्ष सपन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश शिंदे यांना यश संपादन करता आले. प्रहार संघटनेचे इगतपुरी तालुका संपर्कप्रमुख पत्रकार मंगेश शिंदे यांचे वडील आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!