गोंदे फाट्यावरील अपघातात गरोदर महिलेसह वृद्धा आणि तरुण जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने दिलेल्या तत्पर सेवेने जखमी बचावले

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

अपघातांचे नाव ऐकून आता नागरिकांमध्ये घबराट पसरत असली तरी अपघातांची मालिका स्थिर व्हायला तयार नाही. आज दुपारी मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे दुमाला फाट्यावर एका वाहनाने हुलकावणी दिल्याने कारचा अपघात झाला. दोन तीन पलट्या झाल्याने कारमधील ३ जण जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला.

MH 12 NE 8994 ही कार नाशिककडून मुंबईच्या दिशेने जात असतांना एका वाहनाने त्यांना हुलकावणी दिली. यावेळी झालेल्या अपघातात कारने दोन तीन पलट्या मारल्या. यामुळे झालेल्या अपघातात मीनल गौतम चौगुले वय 37, गौतम अशोक चौगुले वय 32, मोनिका फर्नांडिस व्या 73 सर्वच राहणार मुंबई हे जखमी झाले. यामध्ये मीनल चौगुले या गरोदर असल्याने त्यांना अपघाताचा धक्का जास्त बसला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांच्या तत्पर सेवेमुळे जखमींवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान वाढत्या अपघातांमुळे हिंदवी स्वराज्य ग्रुपचे डॉ. रुपेश नाठे यांनी २८ मे ह्या दिवशी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!