इगतपुरी, घोटी पोलीस ठाण्यात एल्गार कष्टकरी संघटनेच्या महिलांकडून अनोखे रक्षाबंधन

इगतपुरीनामा न्यूज – रक्षाबंधनाचा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपले संरक्षण करतात. त्यांना कोणतेही सण उत्सव त्यांच्या परिवारासोबत साजरे करता येत नाहीत. त्यामुळे एल्गार कष्टकरी संघटनेकडून इगतपुरी आणि घोटी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला. संघटनेच्या कोषाध्यक्षा सुरेखा मधे यांच्या नेतृत्वाखाली आज महिलाप्रमुख मंगल खडके, मथुरा भगत, रोहिणी चव्हाण, गुजराबाई ठाकरे, राधाबाई मेंगाळ, चंद्रभागा आगिवले, मथुरा आघाण, सुमनबाई शिद, सरुबाई ठाकरे, बबाबाई ठाकरे आदी महिला कार्यकर्त्यांनी घोटी आणि इगतपुरी पोलीस ठाणे रक्षाबंधन साजरे केले. आपल्या आई बहिणींचे रक्षण करणाऱ्या, समाजाला सुरक्षित ठेवणाऱ्या आणि कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांना उपस्थित महिलांनी राखी बांधून बांधली. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक सोपान राखोंडे, घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पोलिसांतर्फे महिला भगिनींचे ऋण व्यक्त केले.

Similar Posts

error: Content is protected !!