इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आरोग्य सेविका या संवर्गातून आरोग्य सहाय्यिका या संवर्गात १२ महिला कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नतीने पदस्थापना दिली. पदोन्नती दरम्यान समुपदेशनासाठी अपंग, दुर्धर आजाराने त्रस्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, पदोन्नती समितीचे अधिकारी आदी उपस्थित होते. समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत मुख्य कार्यकारी अधिकारी व पदोन्नती समिती व आरोग्य विभागातील संकलन, सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले. अनेक महिन्यांपासून आरोग्य सेविका पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होत्या. अखेर ह्या आरोग्यसेविकांना न्याय मिळाला. या कामासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा शोभाताई खैरनार, सरचिटणीस प्रमिला मेदडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
पदोन्नती झालेल्या आरोग्य सहाय्यिका खालीलप्रमाणे आहेत.
प्रमिला उगले- मेदडे – जातेगाव, नासिक
सुनिता डोंगरे – वडनेर भैरव, चांदवड
शांता जाधव – सोमठाणे, सिन्नर
रोहिणी केदारे – आंबोली, त्र्यंबक
प्रतिभा चौधरी – लहवित, नासिक
वनिता कुलकर्णी – धामणगाव, इगतपुरी
मंगला गोळेसर – खेड, इगतपुरी
मंदा शिंदे – बेलगाव कुऱ्हे, इगतपुरी
सविता पगारे – नायगाव, सिन्नर
रत्नप्रभा तुपलोंढे – वरखेडा, दिंडोरी
सुरेखा देवरे – सौंदाणे, मालेगाव
सरस्वती मुळे – वैतरणा, इगतपुरी