इगतपुरी तालुक्यात पुतण्याचा चुलतीवर बलात्कार : संशयित पुतण्याला घोटी पोलिसांकडून अटक

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील २८ वर्षीय विवाहित चुलतीवर चक्क पुतण्याने लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात पुतण्याच्या विरोधात फिर्याद फिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित २२ वर्षीय आरोपी पुतण्याला अटक करण्यात आले आहे. ह्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

फिर्यादीमध्ये नमूद अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील २८ वर्षीय विवाहित महिला मांजरगाव येथे विवाहाच्या पुऱ्या करण्यासाठी गेली होती. गुरुवारी रात्री 11 ते 12 च्या सुमाराला २८ वर्षीय पुतण्या घराबाहेर आलेल्या पीडित चुलतीकडे आला. पीडित चुलतीला त्याने सांगितले की, नाना ( पीडित महिलेचे पती ) दारू पिऊन पडले आहेत. चल तुला दाखवतो सांगितले असता महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून ती पुतण्यासोबत गेली. यावेळी त्याने महिलेला नाल्यासारख्या खड्डयांजवळ नेले. महिलेला मारहाण करून त्याने तोंड दाबले. यावेळी त्याने महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध केले. कोणाला सांगितले तर जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली.

पीडित महिलेने पतीला सर्व घटना सांगितल्यानंतर घोटी पोलीस ठाण्यात हजर होऊन महिलेने याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी पुतण्याला पोलीसांनी अटक केले आहे. संशयिताने पोलीस चौकशीत गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेचे कलम 376, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केदारे, गायकवाड आदींनी कसून तपास सुरू केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!