शिक्षक भारतीच्या वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

रोटरी क्लबच्या वतीने राष्ट्र बांधणीचे शिल्पकार या पुरस्काराने पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आले. यामध्ये मॉडर्न हायस्कूल  व ज्युनिअर कॉलेज अकोले येथील प्राचार्य संतोष कचरे, सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवाडा येथील प्राचार्य सुरेश आंबरे, प्राथमिक विभागाचे शिक्षक काळू तपासे यांचा समावेश आहे. शिक्षक भारती अहमदनगर जिल्हा व अकोले तालुका यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडीसा यांच्या वतीने दिला जाणारा कोरोना योद्धा समाजसेवा रत्नगौरव पुरस्कार व डॉक्टरेट पदवीदान राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते शिक्षक भारती संघटनेचे संघटक सोमनाथ बोनंतले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक भरतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर, जिल्हा समन्वयक योगेश देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती अकोले तालुकाध्यक्ष संपत वाळके, कार्याध्यक्ष गणपत धुमाळ, माध्यमिक विभागाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष दत्तात्रय घुले, संतोष जोशी, गुरुकुले, ढोकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!