इगतपुरीनामा न्यूज – संघटन कसे करायचे? संघटन कसे असते? हे सामान्य कार्यकर्त्यांच्या भूमिकेत गेल्यावर कळते. आपण कार्याच्या माध्यमातून लोकांच्या मनामनात बसलो पाहिजे. नाभिक समाजाच्या जडण घडणीसाठी आपण एकत्र आलो पाहिजे. समाज संघटित असेल तरच समाजाची प्रगती होते. शिवरायांकडे संघटन कौशल्य होते. अवघ्या मूठभर मावळ्यांसोबत महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. सोबत नाभिक समाजाचे जिवाजी महाले आणि शिवा काशीद होतेच. अनेक राजे होऊन गेले पण शिवाजी महाराजांना कोणी विसरणार नाही असे प्रतिपादन नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान अण्णा बिडवे यांनी नाशिक येथे केले. नाभिक एकता महासंघातर्फे शिवजयंती उत्सव, दिनदर्शिका प्रकाशन आणि नाशिक जिल्हा पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. यावेळी भगवान अण्णा बिडवे यांनी दिनदर्शिकेच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा प्रत्येक घरात पोहचणार आहे असे सांगितले.
कार्यक्रमावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय वाघ, प्रदेश सरचिटणीस सुभाष मामा बिडवई, किरण भांगे, उपमहा विभागीय अध्यक्ष देवेंद्र तासकर, जिल्हाध्यक्ष रमेश बिडवे, उप महा जिल्हाध्यक्ष सुनिल सोनवणे, जिल्हाध्यक्ष वधूवर आघाडी सुधाकर गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष कीर्ती जाधव, विभागीय उपाध्यक्ष श्रीकांत वाघ, जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे, नाशिक महानग अध्यक्ष राजेंद्र महाले, युवा जिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण, ॲड. सुनिल कोरडे, कोषाध्यक्ष वधूवर आघाडी म्हाळुजी चौधरी, सलून असोसिएशन जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, महानगर कार्याध्यक्ष राहुल तुपे, उपजिल्हाध्यक्ष निवृत्ती आंबेकर, संघटक अशोक सूर्यवंशी, गणेश रायकर, महानगर सरचिटणीस भरत गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संपत जाधव, संदीप व्यहवरे, वसंतराव सोनवणे, अशोक कदम, महानगर अध्यक्ष कर्मचारी आघाडी शैलेश जाधव, गणेश चौधरी, संजय सोनवणे, महेंद्र कानडी, माधव शिंदे, बाळासाहेब साळुंके, रवींद्र बिडवे, राजेंद्र बिडवे, दत्तू पंडित, राजाभाऊ मोरे, गणेश कडवे, संतोष खडांगळे, अंबादास कदम, प्रकाश तुपे, सुखदेव शिंदे, चंद्रकांत कदम, संतोष पंडित आदी पदाधिकारी, समाज बांधव आणि नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातून पदाधिकारी उपस्थित होते.