इगतपुरी तालुक्यातील पहिली ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्यांचा गौरव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे मातोश्री हॉस्पिटलचा झाला सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि.  १९

कोणत्याही गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया म्हटल्या की इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्यात अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यामुळे नाशिक, मुंबईला रुग्णाला उपचारासाठी पाठवावे लागते. मात्र घोटीतील मातोश्री हॉस्पिटल याला अपवाद असून इगतपुरी तालुक्यातील पहिली ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया याठिकाणी यशस्वी झाली आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हॉस्पिटलचे संचालक डॉ. जितेंद्र चोरडिया व कर्मचारी यांचा गौरव केला. इगतपुरी तालुक्यातील अशा प्रकारची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचे प्रतिपादन गुंजाळ यांनी यावेळी केले.

कुर्णोली येथील गरीब आदिवासी कुटुंबातील ४० वर्षीय सरुबाई तेलम यांची ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया इगतपुरी तालुक्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया ठरली आहे. याकामी प्रसिद्ध मेंदूरोगतज्ञ डॉ.अनिल जाधव, भुलतज्ज्ञ डॉ.संजय वलवे, डॉ. हेमलता चोरडिया, डॉ. जितेंद्र चोरडिया, कर्मचारी मनीषा शिंदे, दीपाली धादवड, मोनिका पगारे, जीवनदायी योजनेचे अधिकारी डॉ. तुषार मोरे, कुलदीप क्षीरपूरकर, राहुल सोनवणे, समकीत साखला, पंकज दाभाडे हरिष मुंगसे यांची मदत झाली. या सर्वांचे काँग्रेसतर्फे ऋण व्यक्त करण्यात आले.काँग्रेसच्या शिष्टमंडळात जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे, उद्योजक मुरलीधर दुर्गुडे, साहित्यिक बाळासाहेब पलटणे, भिका शिंदे, सोमनाथ कोरडे, रेवणनाथ सोनवणे, गोरख म्हसणे, डॉ. नहाटा, डॉ. कोरडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!