गोंदेजवळ अपघातात वाघेरे येथील २ युवक गंभीर जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. 23

मुंबई आग्रा महामार्गावर नासिकहुन घोटीच्या दिशेने जाणारी मोटारसायकल अचानक घसरल्याने अपघात झाला. सायंकाळी 7 वाजता थायसनकृप कंपनीजवळ ही घटना घडली. या अपघातात वाघेरे ता. इगतपुरी येथील 2 युवक गंभीर जखमी झाले आहेत. गणेश नारायण भोर वय 32,विलास शांताराम भोर वय 29 अशी जखमींची नावे आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!