
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – इगतपुरी येथील जनता विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांचे गुलाबपुष्प व ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निलम बागुल यांनी विद्यालयाचा इतिहास, वाटचाल आणि समस्यांचा मागोवा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विभाग स्थानिक व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष विजय वामनराव कडलग होते. उच्च माध्यमिक शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अनिल तुळशीराम भोपे यांनी यावेळी विद्यालयाबद्धल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्ष विजय कडलग, नंदलाल भागडे, सत्तार इस्माईल मणियार यांनी विद्यालयाच्या विकासासाठी सर्व सदस्य कटिबद्ध असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन दत्तात्रय कुंदे यांनी तर आभार नामदेव रोंगटे यांनी मानले.