किचकट व बऱ्याच औषधांना सहजासहजी न जुमानणारा आजार सोरायसिस

मार्गदर्शक : डॉ. प्रदीप व डॉ. सौ. चैताली बागल
बागल होमिओपॅथी क्लिनिक, बॉम्बे हॉटेलच्यामागे, वरची पेठ
इगतपुरी, जि. नाशिक संपर्क 9270118140

सोरायसिस ( Psoriasis ) हा एक असा त्वचाविकार आहे, जो तुम्हाला हात, पाय, पाठीवर अथवा केसांमध्ये जाणवतो. याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसत असला तरी त्याचा गंभीर परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होत असतो. या रोगामध्ये त्वचापेशीची अतिरिक्त व जलद गतीने वाढ होते. ज्यामुळे त्वचेवर लालसर पापुद्रे निर्माण होतात. काहींच्या त्वचेवर यामुळे लालसर चट्टे निर्माण होतात. त्वचेला प्रंचड खाज येते. काही संधोशनात असं आढळलं आहे की, सोरायसिस हा संक्रमणातून होणारा आजार नसून तो तुमच्या प्रतिकार शक्तीमध्ये होणाऱ्या बदलातून निर्माण होतो. आपल्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाऊन नवीन पेशी निर्माण होण्यासाठी जवळजवळ 28 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र सोरायसिस झालेल्या लोकांमध्ये चार ते पाच दिवसांमध्ये नवीन पेशींची निर्मिती होते. ज्यामुळे त्वचेवर या नवीन त्वचापेशींचा थर जमा होऊ लागतो. पुढे त्याचे रूपांतर खाज, लालसरपणा, चट्टे यामध्ये होत जातं. सोरायसिस हा गंभीर त्वचारोग असल्यामुळे याबाबत तुम्हाला आधीच सर्व काही माहीत असणं आवश्यक आहे. ती माहिती ह्या लेखातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.

सोरायसिसची लक्षणे
सोरायसिसचे लक्षण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असू शकते. मात्र साधारणपणे सर्वांनाच या त्वचा विकारामध्ये त्वचेवर भयंकर खाज येते. एवढंच नाही तर अति खाजवण्यामुळे त्वचेचे पापुद्रे निघतात आणि त्वचेवर सूज दिसू लागते.
कोरडी आणि भेगाळलेली त्वचा ( Cracked And Dry Skin ) – त्वचेवर नवीन होणाऱ्या त्वचापेशींचा थर जमा झाल्यामुळे त्वचेचं योग्य पोषण होत नाही आणि त्वचा कोरडी, निस्तेज होते. काही जणांमध्ये त्वचेवर भेगा पडलेल्या दिसू लागतात तर काहींची त्वचा या रोगामध्ये कोरडी झाल्यामुळे तिचे पापुद्रे सुटू लागतात.
स्काल्पमध्ये खाज ( Scaly Scalp ) ; सोरायसिस हा आजार केसांमध्येही होत असल्यामुळे तुमचा स्काल्पमध्ये लालसर आणि जाडसर चट्टे उठतात, केसांमध्ये कोंड्याप्रमाणे पांढरा पदार्थ तयार होतो. स्काल्प कोरडा झाल्यामुळे केसांचे नुकसान होते, केस भरपूर प्रमाणात गळू लागतात. त्वचेला प्रंचड खाज येते आणि दाह जाणवतो.
त्वचेतून येणाऱ्या वेदना – सोरायसिसमध्ये त्वचेला खूप खाज येते. ज्यामुळे त्वचेमध्ये दाह निर्माण होतो आणि जळजळ जाणवते. साहजिकच या दाह आणि वेदनेतून मुक्तता मिळावी असं रोग्याला वाटू लागतं. या त्वचारोगाने गंभीर रूप धारण करू नये यासाठी खाज आल्यावर त्वचा हाताने खाजवू नका.
नखे ठिसूळ होतात ( Pitted Nails ) – जर तुम्हाला नखांचा सोरायसिस झाला तर यामुळे तुमची नखे ठिसूळ होतात. नखांवरील आवरण हे केरॅटिन सेल्समुळे कठीण असते. मात्र या रोगात तुमच्या या नखांच्या पेशींचे नुकसान होते आणि नखे ठिसूळ आणि भेगाळतात. नखांचा आकार, जाडसरपणा आणि रंग नेहमीपेक्षा वेगळा दिसू लागतो. नखं ठिसूळ झाल्याने पटकन तुटतात.
सांधे दुखी (Joint Pain) – सोरायसिस तीव्र झाल्यास तुम्हाला सोरायटिक आर्थ्रायटीसचा त्रास जाणवू शकतो. सोरायटिक आर्थ्रायटीसमुळे तुमच्या सांध्यावर वाईट परिणाम होतो. तुमच्या एक अथवा दोन्ही बाजूचे सांधे यामुळे दुखावले जाऊ शकतात. यामुळे हाता-पायाच्या सांध्यामध्ये सूज आणि वेदना होतात. वेदनेची तीव्रता इतकी वाढत जाते की यामुळे तुम्हाला दैनंदिन कामे करणेही कठीण होते.

सोरायसिसची कारणे
सोरायसिस होण्यामागची कारणे प्रत्येक व्यक्तीमागे वेगवेगळी असतात. त्यामुळे सोरायसिस होण्यामागचं नेमकं कारण कुणीच सांगू शकत नाही. मात्र ही काही कारणं आहेत ज्यामुळे सोरायसिस होऊ शकतो.
1) अनुवंशिकता( Hereditary )
काही संशोधनात असं आढळलं आहे की जर एखाद्याच्या आई-वडीलांना, आजी-आजोबांना अथवा भावंडांना सोरायसिस झाला असेल तर त्या व्यक्तीला सोरायसिस होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत जास्त असतो. यामागे त्यांच्यातील अनुवंशिकता कारणीभूत असू शकते. जरी तुमच्यामध्ये अनुवंशिक गुण असले तरी वातावरणातील बदलामुळेच हे गुणधर्म कार्यान्वित होतात. त्यामुळे जोपर्यंत वातावरणात असे बदल होत नाहीत तो पर्यंत सोरायसिस त्या व्यक्तीमध्ये सहज विकसित होत नाही.
2) त्वचेवरील जखमा ( Injury To The Skin )
जर तुमच्या त्वचेवर कापल्याच्या, ओरखडे उठल्याच्या, कीटकदंशाच्या, एखाद्या इनफेक्शनच्या जखमा असलीत तर अशा स्थितीत सोरायसिस बळावण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे त्वचेवरील अशा गंभीर जखमा हे देखील सोरायसिस होण्यामागचं एक कारण असू शकतं. बऱ्याचदा गंभीर प्रमाणात झालेलं सनबर्नही सोरायसिस होण्यामागचं एक कारण असू शकतं. त्यामुळे जर तुमच्या त्वचेवर अशा जखमा असतील तर त्यावर त्वरीत योग्य ते उपचार करा.
3) सुर्यप्रकाश ( Sunlight )
मानवी शरीराच्या वाढ आणि विकासासाठी योग्य प्रमाणात सुर्यप्रकाश मिळण्याची आवशक्ता असते. कारण सुर्यप्रकाशातून शरीराला व्हिटॅमिन डीचा पूरवठा होत असतो. मात्र नैसर्गिक सुर्यप्रकाश हा प्रमाणातच मिळणं गरजेचं आहे. शिवाय सकाळचे कोवळे ऊनच त्वचेसाठी उपयुक्त असते. त्यानंतरचे प्रखर ऊन त्वचेसाठी उपयुक्त तर ठरत नाही उलट अपायकारक ठरू शकते. अशा प्रखर सुर्यप्रकाशामुळेही सोरायसिस होऊ शकतो, शिवाय ज्यांना आधीच सोरायसिस आहे त्यांच्यासाठी सुर्यप्रकाश हानिकारक ठरू शकतो.
4) औषधे ( Drugs )
काही औषधे आणि स्टिरॉईडच्या वापरामुळेही शरीरात दाह आणि जळजळ निर्माण होते. ज्याचा परिणाम त्वचेवर सोरायसिस होण्यावर होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही घेत असलेल्या औषधांमुळे अथवा स्टिरॉईडमुळे तुम्हाला त्वचेवर गंभीर लक्षणे जाणवू लागली तर त्वरीत डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.
5) भावनिक ताणतणाव ( Emotional Stress )
सोरायसिस हा आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या प्रतिकार शक्तीशी निगडीत होणारा एक त्वचा रोग आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या भावनिक ताणतणावात असता तेव्हा त्याचा परिणाम नकळत तुमच्या प्रतिकार शक्तीशी येत असतो. काही संधोधनात असं आढळून आलं आहे की मानसिक अथवा भावनिक ताणतणावामुळे गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. सोरायसिसदेखील तुमच्या भावनिक ताणाचा एक परिणाम असू शकतो.
6) हॉर्मोनल बदल ( Hormonal Changes )
किशोरवयात मुला-मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात होणाऱ्या हॉर्मोनल बदलाचा एक परिणाम म्हणजे सोरायसिस असू शकतो. महिलांमध्ये मॅनोपॉजच्या काळातही असेच परिणाम शरीरात दिसू लागतात. काही महिलांमध्ये गरोदरपणात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे त्वचेवर हा गंभीर त्वचाविकार जाणवतो. कधी कधी ही लक्षणे काही काळापूरती कमी होतात. मात्र पुन्हा जेव्हा शरीरात हॉर्मोनल बदल जाणवतात तेव्हा ती पुन्हा दिसू लागतात.
7) व्यसन ( Smoking And Alcohol )
ज्या लोकांना अति धुम्रपान, मद्यपानाचे व्यसन असते अशा लोकांमध्ये सोरायसिस होण्याचा धोका जास्त जाणवतो. तुमच्या घरात कुणी सातत्याने धुम्रपान करणारी व्यक्ती असेल तरीही तुम्हाला सोराससिस होऊ शकतो. अशा लोकांना लक्षणे लवकर जाणवत नाहीत शिवाय आजार लवकर पूर्ण बराही होत नाही. यासाठीच जर तुम्हाला अशी व्यसने असतील तर त्यापासून लवकरात लवकर स्वतःला मुक्त करा. कारण सोरायसिस झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच दक्षता घेणं नेहमीच योग्य ठरेल.

सोरायसिस वर घरगुती उपचार ( Home Remedies For Psoriasis )
सोरायसिसमुळे त्वचेला येणारी खाज आणि दाह कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतात. त्यामुळे त्वरीत आराम हवा असेल तर तुम्ही सोरायसिसवर घरगुती उपचार नक्कीच करू शकता.
सॉल्ट बाथ ( Salt Baths )
कोमट पाण्याने केलेल्या आंघोळीमुळे तुमच्या त्वचेला आराम मिळू शकतो. विशेषतः जर तुम्हाला सोरायसिसचा त्रास असेल तर आंघोळीच्या कोमट पाण्यात थोडं मीठ टाका. ज्यामुळे तुमच्या शरीराला येणारी खाज कमी होईल. सोरायसिस झालेल्या लोकांना डेड सी सॉल्टने अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यात खूप मिनरल्स असतात आणि ते समुद्री पाण्यापेक्षा जास्त खारट असते. काही संशोधनात असं सी सॉल्टने आंघोळ केल्यामुळे सोरायसिसच्या लोकांच्या लक्षणांमध्ये बदल झालेला आढळून आला आहे.
कोरफड ( Aloe Vera )
जर तुम्हाला सोरायसिस असेल आणि त्यामुळे तुमच्या त्वचेला प्रचंड खाज येत असेल तर तुम्ही कोरफडाचा गर अथवा कोरफडयुक्त क्रिम तुमच्या त्वचेला लावू शकता. यामुळे तुमच्या  त्वचेला लालसरपणा, खाज आणि दाह नक्कीच कमी होईल. कोरफडात ॲंटी इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे कोरफड त्वचेला लावल्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचेचा दाह कमी होतो. मात्र चांगल्या परिणामासाठी नियमित आणि सतत ही क्रिम त्वचेवर लावायला हवी.
ओमेगा थ्री फॅटी ॲसिड ( Omega-3 Fatty Acids )
ओमेगा थ्री फॅटी ॲसिडयुक्त आहार घेतल्यामुळे शरीराचा दाह आणि जळजळ कमी होते. त्यामुळे सोरायसिसच्या लोकांना त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी असा आहार घेण्यास काहीच हरकत नाही. यासाठी तुम्ही अळशीच्या बिया, सुकामेवा, सूपरसीड्स, सोयाबीन आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिडयुक्त मासे असा आहार घेऊ शकता. तुमच्या आहारात यासाठी फिश ऑईलदेखील असायला हवं.
हळद ( Turmeric )
हळद त्वचेच्या अनेक समस्यांवर उपयुक्त आहे. हळदीमध्ये ॲंटीसेप्टिक आणि ॲंटी फंगल गुणधर्म असतात. काही संशोधनात सोरायसिसवर उपचार करण्यासाठी हळदीचा लेप लावण्यात आला आहे. हळदीचा लेप अथवा हळदयुक्त क्रिम, जेल त्वचेवर लावण्यामुळे तुमच्या त्वचेच्या वाढत जाणाऱ्या थर, लालसरपणा, चट्टे, खाज यामध्ये बदल जाणवू शकतो. मात्र हळदीचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा  सल्ला अवश्य घ्या.

सोरायसिस होऊ नये किंवा झाल्यावर घ्यावयाची काळजी

वजनावर नियंत्रण ठेवा ( Maintaining A Healthy Weight )
लठ्ठपणामुळे सोरायसिस होण्याचा धोकाच वाढत नाही तर सोरायसिस झाल्यास अधिक त्रास होण्याची शक्यता असते. म्हणजेच जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्हाला सोरायसिसमुळे होणारा त्रास इतरांपेक्षा दुप्पट जाणवू शकतो. यासाठी वेळीच वजनावर नियंत्रण ठेवा. सोरायसिसवर उपचार करण्यासाठी आधी तुम्हाला तुमचे वजन कमी करावे लागेल. योग्य सोरायसिस आहार, व्यायाम आणि गोड पदार्थांवर नियंत्रण ठेवून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. सोरायसिसचा त्रास असेल तर बाजारात मिळणारे प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे जाणिवपूर्वक टाळा.
कोरड्या त्वचेची काळजी घ्या ( Prevent Dry Skin )
सोरायसिसमध्ये त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या काळात तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. कोरड्या त्वचेवर जास्त खाज येत असल्यामुळे तुमचा त्रास अधिक वाढू शकतो. यासाठीच घरातील वातावरणही जास्तीत जास्त हवेशीर आणि खेळतं राहील याची काळजी घ्या. जरी तुमची त्वचा संवेदनशील झालेली असली तरी त्वचेला नियमित मॉईस्चराईझ करण्यास विसरू नका. त्वचा मॉईस्चराईझ करण्यासाठी घरगुती उपचार देखील तुम्ही करू शकता.
कोणत्याही गंधापासून दूर रहा ( Avoid Fragrances )
आजकाल बाजारात विकत मिळणाऱ्या अनेक साबण आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुगंधाचा वापर करण्यात आलेला असतो. मात्र त्यासाठी वापरण्यात आलेल्या केमिकल्समुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. सोरायसिसचा त्रास अधिक बळावू नये यासाठी अशा गोष्टींपासून दूर राहा. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेला सुगंधासोबतच दाह आणि जळजळदेखील जाणवेल. जर तुमची त्वचा अति संवेदनशील असेल तर तुम्ही अशी उत्पादने जाणिवपूर्वक टाळायला हवी.
ताण कमी करा ( Reduce Stress )
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव हा प्रत्येकालाच आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की त्या ताणामुळे तुम्ही तुमचे आरोग्य बिघडून घ्याल. प्रत्येक तणावाला हाताळण्याची हातोटी तुम्हाला नक्कीच शिकून घ्यायला हवी. जर तुम्हाला सोरायसिसचा त्रास असेल तर ताणामुळे तो अधिक गंभीर होऊ शकतो. यासाठीच अशा स्थितीत ताणतणावापासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करा. ताणावर नियंत्रण मिळवण्यासाठी योगासने आणि मेडिटेशनचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो.
धुम्रपान, मद्यपान टाळा ( Avoid Alcohol And Smoking )
जर तुम्हाला धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असेल तर तुम्हाला ती त्वरित थांबवावी लागेल. कारण या सवयींमुळे तुमचा सोरायसिसचा त्रास अधिकच बळावू शकतो. त्यामुळे या त्रासातून मोकळं होण्यासाठी आणि आनंदाने जगण्यासाठी व्यसनांपासून शक्य तितकं दूर राहा. व्यसन सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत त्यांचा वापर करून व्यसनमुक्त व्हा.

सोरायसिसवरील उपचार ( Psoriasis Treatment )
आधीच सांगितल्या प्रमाणे प्रत्येक रुग्णाचा सोरायसिसचा प्रकार आणि लक्षणे वेगवेगळी असल्यामुळे त्यावर केले जाणारे वैद्यकीय उपचारही वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे आधी त्याचे निदान केले जाते मग उपचार दिले जातात.

अशा विविध त्वचाविकारांसाठी आमच्या पत्त्यावर किंवा फोन नंबरवर आपण संपर्क साधू शकतात. बाहेरगावच्या रुग्णांना प्रत्यक्ष येणे शक्य नसेल तर ऑनलाइन रुग्ण संवाद साधला जातो. सोरायसिस होमिओपॅथी उपचारांनी कायमचा बरा होण्यासाठी जेवढा जास्त जुना आजार तितका जास्त कालावधी लागतो. म्हणून रुग्णांना धीर असणं आणि उपचारात सातत्य*असणं खूप जास्त गरजेचं असते. ह्या लेखासोबत आमच्या क्लिनिकला फक्त होमिओपॅथी घेतलेल्या एका रुग्णाचे उपचाराआधी व नंतरचे फोटो उदाहरणासाठी पोस्ट करत आहे.

.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!