इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
शिक्षक मित्र सुभाष अहिरे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ११ जागांसाठी झालेली पंचवार्षिक निवडणूक ( सन – २०२२ ते २०२७ ) बिनविरोध झाली. तत्कालीन शिक्षक बँक प्रचंड भ्रष्टाचारामुळे अवसायनात निघाल्याने शिक्षकांना त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी प्राथमिक शिक्षक एकत्र येऊन स्व- भांडवलावर संस्था उभी केली. शिक्षक बँकेचे दि प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत रूपांतर केले. आचार्य दोंदे भवन विकसनात मोलाचे कार्य केल्यामुळे सभासदांनी सुभाष अहिरेचे नाव नव्याने स्थापन झालेल्या संस्थेला नाव दिले. सभासदांना पतसंस्थेकडून कर्ज मर्यादा दहा लाखापर्यंत व तातडीचे कर्ज पन्नास हजार रुपये उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सभासदांचे हित लक्षात घेता बिनविरोध निवड परंपरा या संस्थेने कायम राखली असल्याने सभासदांनी आनंद व्यक्त केला. पतसंस्था अ वर्गात असल्याने संस्था नावारूपाला आली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक मित्र सुभाष अहिरे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुभाष अहिरे पाटील, प्राथमिक शिक्षक संघ संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अशोक ठाकरे, राज्य उपाध्यक्ष भरत पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख सुभाष साईनकर, आदिवासी शिक्षक संघटनेचे नेते चंद्रकांत लहांगे यांच्या परिश्रमातून निवडणूक बिनविरोध पार पडली. बिनविरोध संचालक मंडळामध्ये सर्वसाधारण गटातून – १) सुभाष अहिरे पाटील, २ ) विवेक पुंडलिक खैरनार, ३) किरण रामराव बोरसे, ४) अनिल दगडू बाविस्कर, ५) संजय सोमनाथ येशी, ६) रवींद्र गंगाराम लहारे, महिला राखीव गट ७) इंदिरा मोरे–ठाकरे, ८) माधुरी विसपुते मैंद, इतर मागास गट ९) प्रमोद पाटील, अनु जाती जमाती गट १०) शाहिदास किसन गांगुर्डे, भटके, विमुक्त गट ११) धनंजय भावगीर गोसावी यांचा समावेश आहे.