मुंढेगावजवळ मोटारसायकल अपघातात तळोघ येथील ४ युवक गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज – नासिककडून घोटीच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने आज पहाटे मुंढेगावजवळ अपघात झाला. यामध्ये २ जण गंभीर जखमी तर २ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. भाऊराव नवसू भगत वय २४, आकाश पांडुरंग भगत वय २१, सुदाम सनु भगत वय २१, कौतिक भागा भगत वय २२ सर्व राहणार तळोघ ता. इगतपुरी अशी जखमींची नावे आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेच्या तत्परतेमुळे जखमींचा प्राण वाचला आहे. हा आजचा अपघात असून दुसरा अपघात आजच पहाटे पाडळी देशमुख फाट्यावर झालेला असून त्यामध्ये १ जण ठार, १ जण जखमी झालेला आहे.

Similar Posts

error: Content is protected !!