इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
दिल्ली येथे झालेल्या स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशन महाराष्ट्र आयोजित या ४०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील आशापुर ( टेंभूरवाडी ) येथील किशोर पाटोळे याने पहिला क्रमांक पटकावला आहे. सामान्य शेतकरी सुभाष पाटोळे यांचा तो मुलगा असून त्याचे सर्व क्षेत्रातुन कौतुक होत आहे. सिन्नर येथील मविप्रच्या महाविद्यालयात बारावीमध्ये शिकणाऱ्या ह्या गुणवंत खेळाडूचे विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
यापूर्वी किशोरने तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा जिंकत दिल्ली येथे धडक मारली. ही अटीतटीची स्पर्धा जिंकत त्याने आपला मनसुबा खरा केला. दिला , येणाऱ्या काळात किशोर या धावण्याच्या स्पर्धेत साजीशी कामगिरी करेल असे संकेत अनेकांनी बोलून दाखवले आहे ,परंतु किशोरला योग्य प्रशिक्षणासह चांगल्या प्रशिक्षकाचे साहाय्य मिळाल्यास त्याची कामगिरी उच्चतम असेल असे अनेक जाणकारांनी सांगितले. एखादा खेळाडू निर्माण करून त्यांच्यावरील खर्च सामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असतो. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूकडे अनेक कौशल्य असूनही ते मागे राहतात.