दारणेत बुडून १ जण मृत्यूमुखी ; इगतपुरी पोलिसांकडून तपास सुरु 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बोर्ली वाघ्याची वाडी येथील दारणा नदीपात्रात १ जण बुडून मयत झाला आहे. इगतपुरी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन तत्परतेने कार्यवाही केली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात येऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी बोर्ली वाघ्याची वाडी येथील दारणा नदीपात्रात पुनाजी नामा वीर वय ४५ वर्ष, त्याची पत्नी सखुबाई पुनाजी वीर वय ३८ वर्ष रा. बोर्ली वाघ्याची वाडी, ता. इगतपुरी हे दोघे सोबतच आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पुनाजी नामा वीर हे पोहत असतांना बुडाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून पुढील तपास सुरु केला आहे. गेल्या आठवड्यात भावली धरणात ५ तर वैतरणा धरणात बुडून २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज ही घटना घडली.

Similar Posts

error: Content is protected !!