मुकणे प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव मोबदल्यासाठी महसूलमंत्र्यांना साकडे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणासाठी वाढीव उंचीसाठी अनेकांच्या जमिनी गेलेल्या आहेत. गेल्या आठ दहा वर्षांपासून जमीनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. ह्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराप्रमाणे मोबदला द्यावा अशी जुनी मागणी आहे. आज प्रकल्पग्रस्त शेतकरी व इंदिरा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. संबंधित शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.

पाण्याखाली गेलेल्या जमिनींचे पंचनामे करून १४ गावांचा रखडलेला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाला सूचित करण्यात येईल अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. ह्या प्रकरणावर पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा होऊन प्रश्न निकाली निघणार असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. शिष्टमंडळात डॉ. दिलीप खातळे, इंदिरा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, ज्येष्ठ नेते रावसाहेब मालुंजकर, निवृत्ती कातोरे, शंकरराव गोवर्धने, कचरू गोवर्धने, नामदेव गोवर्धने, निवृत्ती गोवर्धने आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!