इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
अखंड भारत देशाचे आदर्श, राष्ट्रीय सन्मान व भारतीय लोकशाहीचे जनक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अपमान व अवमान व्हावा असे शब्द वापरले. इगतपुरी तालुक्यात याबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. कुठल्याही राजकीय पक्षाने छत्रपतींचा अवमान सहन करू नये अशी भूमिका रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी मांडली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाई व्हावी ह्या मागणीचे निवेदन घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना देण्यात आले.
यावेळी रुपेश हरिश्चंद्र नाठे, शिवव्याख्याते सुनील भोर, नारायण जाधव, गोकुळ धोंगडे, राजु गतीर, तुकाराम जगताप, नामदेव कोकणे, सोहम धांडे, प्रणव जाधव ऋतिक जाधव आदी शिवभक्त उपस्थित होते. शिवप्रेमींचे, शिवरायांना आदर्श मानणाऱ्यांचे व छत्रपती घराण्याचे मन व अस्मिता दुखावणाऱ्या घटना वाढत आहे. शिवभक्तांकडून काहीतरी समाजविघातक अथवा समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य घडावे यासाठी प्रयत्न केला जातोय. हे कायदेशीररित्या असंविधानिक व लज्जास्पद आहे असे ठाम मत रुपेश नाठे यांनी यावेळी मांडले.