इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ११ शाळांना संगणक संचाचे वाटप करण्यात आले. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या हस्ते हा कार्यक्रम घोटी संभाजी नगर सभागृहात संपन्न झाला. व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे, इगतपुरी युवक शहराध्यक्ष गणेश कौटे, अनु. विभाग तालुकाध्यक्ष संतोष जगताप, युवक सरचिटणीस योगेश सुरुडे, लक्ष्मण गोडे होते.
इगतपुरी तालुक्यात डॉ. तांबे यांनी जातीने लक्ष केंद्रित केले असून यापूर्वीही अनेक शाळांना संगणक संच दिले आहे. म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आदिवासी भागातील विध्यार्थी शिक्षण घेऊन मोठा होत आहे. एसएमबीटी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षण मिळत असल्याने तालुका नकाशावर आणण्याचे काम डॉ. तांबे यांनी केले असल्याचे प्रदेश सचिव गुंजाळ यांनी सांगितले. संगणक संचासाठी गुंजाळ हे सातत्याने पाठपुरावा करत होते. अजुनही काही शाळांना संगणक मिळतील असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला। याप्रसंगी संतोष शिरसाठ, ओमानंद घारे, शिक्षक श्री. पाटील, श्री. हिरे, श्री. कुमावत, कवडदरा, कावनई, काळूस्ते, माणिकखांब, सांजेगाव, इगतपुरी ह्या ११ शाळेतील मुख्याध्यापक व कार्यकर्ते उपस्थित होते.