इगतपुरीनामा न्यूज, दि ६
इगतपुरी तालुक्यातील सर्व गावे आणि शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी ९ वाजता शिवस्वराज्यदिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शासनाने दिलेल्या संहितेचा अवलंब करण्यात आला. भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूर्यास्ताच्या प्रसंगी राजदंड स्वराज्य गुढी खाली घेण्यात येणार आहे.
गोंदे दुमाला येथे शिवस्वराज्य दिनाचा आनंदोत्सव
गोंदे दुमाला येथे ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन संपन्न झाला. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे , उपसरपंच परशराम नाठे, माजी सरपंच गणपत जाधव सहभागी झाले. कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शिवराम बेंडकुळे, शोभा नाठे, गोपाळ नाठे, सुनिल नाठे, निलेश नाठे, ग्रामविकास अधिकारी विजयराज जाधव, पोलीस पाटील शैला नाठे, सोसायटीचे चेअरमन विजय नाठे, माजी उपसरपंच कमलाकर नाठे, ग्रामस्थ बाळु नाठे, दत्तु आहेर, ज्ञानेश्वर नाठे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनिल नाठे, भाऊसाहेब कातोरे, दत्तु नाठे, गणेश शेळके, जनार्दन नाठे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.