सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
आतापर्यंत वाढोली गावात झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून जो आदर्श ठेवला तोच आदर्श यंदाच्या शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करताना ठेवायचा आहे. यावर्षीही १९ फेब्रुवारीला वाढोली येथे शिवजन्मोत्सव पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात सर्वानी सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन वाढोली येथील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्षपदी पत्रकार ज्ञानेश्वर महाले यांची तर कार्याध्यक्ष पदी सोपान महाले यांची निवड करण्यात आली.
यंदा ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासंदर्भात समितीची बैठक वाढोली येथे पार पडली. सभेत शिवजन्मोत्सव सोहळा १९ फेब्रुवारीला साजरा करण्यासह १८ फेब्रुवारीला रात्री ८ ते ११ सांस्कृतिक कार्यक्रम, १९ फेब्रुवारीला ५ ते ७ ढोल पथकातील पालखी मिरवणूक काढत छत्रपतींच्या जीवनावर व्याख्यान आणि महाराज वेशभुषा आदी विषयावर आयोजित बैठकीत निर्णय घेण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आदर्श निर्माण करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन करत प्रत्येकाने शिवजन्मदिनी आपल्या घरावर भगवा ध्वज उभारून अंगणात रांगोळी काढावी. विजेची रोषणाई करत सणाप्रमाणे शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन सोहळा समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांनी केले.
वाढोली सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा कमिटी
सल्लागार : अंकुश महाले, सचिन महाले
अध्यक्ष : ज्ञानेश्वर महाले
कार्याध्यक्ष : सोपान महाले
उपाध्यक्ष : संदीप महाले, गोकुळ तांबडे
सरचिटणीस : तुकाराम महाले, भाऊसाहेब भालेराव
सचिव : अमोल वाघमारे, गणेश महाले
खजिनदार. : हिरामण महाले, निवृत्ती महाले
सहखजिनदार : सागर महाले
संघटक : अनिल महाले, समाधान महाले, अर्जुन महाले
कार्यकारी मंडळ
निवृत्ती थेटे, संदीप धों. महाले, रोहीदास आचारी, अरुण महाले, अरुण तांबडे, संतोष महाले, वैभव महाले