
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी एका युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यातच आज सकाळी साडेआठच्या दरम्यान दुसरा अपघात घडला आहे. गोंदे फाट्याजवळ महिंद्रा कंपनी परिसरात मोटारसायकलीला एका बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ह्या घटनेत देवळे, ता. इगतपुरी येथील कैलास एकनाथ दालभगत वय २५, कोमल कैलास दालभगत वय २५, साहिल जयराम तोकडे वय २२ हे तीन जण गंभीर जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन तिन्ही जखमी व्यक्तींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेमुळे जखमी व्यक्तींचे प्राण वाचले आहे.