सामाजिक बांधिलकी व सेवाभावी वृत्तीने केलेले कार्य समाजासह विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी – ॲड. संदीप गुळवे : प्रा. देविदास गिरी यांच्या निवृत्तीनिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – सामाजिक बांधिलकी व सेवाभावी वृत्तीने केलेले कार्य समाजासह विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असून यातूनच संस्थांचा विकास आणि भरभराट होत असते असे प्रतिपादन मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांनी केले. इगतपुरी येथील पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांच्या सेवापूर्तीनिमित्त गौरव करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी संचालक भाऊसाहेब खातळे, शिक्षणाधिकारी प्राचार्य डॉ. भास्कर ढोके, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, वैशाली आडके, प्राचार्य सीताराम गोसावी, प्रतिभा गोवर्धने, प्रा. डॉ. अजित धात्रक, जयंत गोवर्धने, प्रथमेश पुरोहित, प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, अजित लुणावत, ॲड. दिनकर खातळे, प्रा . छाया लोखंडे आदी उपस्थित होते. ॲड. संदीप गुळवे पुढे म्हणाले की, प्रा. गिरी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्याना करिअर घडवण्यासाठी केलेले कार्य महत्त्वाचे असून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला.

प्रा. गिरी यांनी याप्रसंगी महाविद्यालयाला ५० हजारांची पुस्तके व विविध शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी २५ हजारांची देणगी दिली. याप्रसंगी भाऊसाहेब खातळे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, प्राचार्य भास्कर ढोके, प्राचार्य सीताराम गोसावी, वैशाली आडके, प्रतिभा गोवर्धने, अजित लुणावत, प्रा. मनोहर घोडे, प्रा. गजानन होडे, प्रा. यू. एन. सांगळे यांनी मनोगते व्यक्त केली. एस. एस. परदेशी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रा. श्री. व सौ. गिरी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बाळाभाऊ सुराणा, पुंजाजी मालुंजकर, ऋग्वेद रानडे, पत्रकार भास्कर सोनवणे, बाळासाहेब पलटणे, विलास गोवर्धने, मुरली हेगडे, रवींद्र रानडे, माणिकराव गोडसे, प्रा. डॉ. मनोज गवारे, कुंदा हेगडे, स्वाती रानडे, प्रा. अरुण पोटे, विजय कर्डक, विकास काजळे, प्रा .एस. व्ही .महाजन, मुख्याध्यापक गोसावी, राहुल सुराणा, गणेश घाटकर, किरण फलटणकर, प्राचार्या प्रतिभा हिरे, प्रा. छाया शिंदे, विठ्ठल भंडारे, क्षिरसागर सर, प्रा. प्रशांत गोवर्धने, प्रा. मितीन उबाळे, गायत्री बेलेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. आर. एम. आंबेकर यांनी तर प्रा. डॉ. आर. डी. शिंदे यांनी आभार मानले.

Similar Posts

error: Content is protected !!