इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ नाशिकच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने सायकलस्वाराला मागून धडक दिली. यामध्ये सायकलस्वार विजय बाबुराव बरकले वय 53 रा. गोंदे दुमाला हे गंभीर जखमी झाले. ही घटना आज रात्री 8 वाजेच्या दरम्यान घडली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन गंभीर जखमीला घोटी येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने अपघातग्रस्त सायकलस्वार बचावल्याने नातेवाईकांनी नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेचे आभार मानले.