इगतपुरी पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी विठ्ठल लंगडे यांची निवड : नवनिर्वाचित जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांचाही झाला सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

इगतपुरी पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी विठ्ठल भगीरथ लंगडे यांची निवड झाली आहे. काळुस्ते गणाचे सदस्य विठ्ठल लंगडे यांच्याकडे तालुक्याचे नेतृत्व आल्याचे समाधान व्यक्त होत आहे. सभापती सोमनाथ जोशी हे रजेवर गेल्याने प्रभारी सभापती म्हणून विद्यमान उपसभापती विठ्ठल लंगडे यांच्याकडे पदभार देण्यात आला. इगतपुरी पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीत निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सभापती विठ्ठल लंगडे यांच्यासज जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्धल गोरख बोडके यांचा पंचायत समिती आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, सोमनाथ जोशी, ज्येष्ठ नेते रघुनाथ तोकडे, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, पंचायत समिती सदस्य अण्णा पवार, प्रशांत कडु, जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, नगरसेवक संपत डावखर, टिटोलीचे सरपंच अनिल भोपे, हरीश चव्हाण, गटनेते दौलत बोंडे, माजी प. स. सदस्य नंदलाल भागडे, आगरी सेना तालुकाध्यक्ष नारायण वळकंदे, शंकर भगत, रमेश धांडे, दिपक कोंबडे, नंदु माळी, तळोघचे सरपंच संतु पा. भगत, उपसरपंच भगिरथ कडु, जनार्दन लंगडे आदी उपस्थित होते. तसेच यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या वतीनेही नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक प्रमोद ठाकरे, दीपक पगार आदी उपस्थित होते. यावेळी गटविकारी अधिकारी लता गायकवाड यांनी नवनिर्वाचित प्रभारी सभापती विठ्ठल लंगडे यांना पदग्रहण केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!