
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
इगतपुरी तालुक्यातील कऱ्होळे येथे आज आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतुन विविध विकासकामांचे उद्घघाटन, भुमीपुजन व लोकार्पण सोहळाउपस्थितीत मठाधिपती गुरुवर्य हभप माधव महाराज घुले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कऱ्होळे येथे नव्यानेच बांधलेल्या भव्य सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे मारूती मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन गुरूवर्य हभप माधव महाराज घुले व प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. हभप माधव महाराज घुले यांनी भव्य मारूती मंदिर उभारण्यात यावे अशी संकल्पना मांडली होती. यावर तात्काळ संमती व होकार दर्शवित आमदार हिरामण खोसकर यांनी या कामासाठी कुठेही निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली.
कावनई ते आवळी रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करू अशी माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृती जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सभापती गोपाळ लहांगे, संपत काळे, पांडुरंग शिंदे, उमेश खातळे, गोपाळ पाटील, संजय कोकणे, काशीनाथ भोर, रामदास जमधडे, कुंडलीक जमधडे, तुकाराम खातळे, लक्ष्मण खातळे, बिरारी सर, सारूक्ते सर, शाळेचे सर्व शिक्षक यांच्यासह भरत खातळे, एकनाथ सायखेडे, गोरख गोवर्धने, ग्रामसेवक भाऊसाहेब मोढे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच पांडुरंग खातळे, पोलीस पाटील मच्छिंद्र खातळे यासह कऱ्होळे ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार व आभार मानुन उद्घघाटन सोहळा पार पडला.
