पाडळी येथे मंदिर भागात २ बिबट्यांमुळे लोकांमध्ये भीती : बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – पाडळी देशमुख गावाच्या जवळ श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात दोन बिबट्यांचा वावर आढळला आहे  दोन कुत्रेही आतापर्यंत बिबट्याने फस्त केले असुन इगतपुरी वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. बिबट्यांचा मानवी वस्तीत शिरकाव वाढला असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुकणे, पाडळी देशमुख गावासह जानोरी रोडवरील सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर व धांडे वस्तीजवळ दोन बिबट्यांचा वावर असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. मानवी वस्तीबरोबरच येथे गणपती मंदिरावर भाविकांचीही ये-जा असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. ह्या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष जयराम धांडे, ठकाजी धांडे, बाळासाहेब गणपत धांडे, विलास धांडे, दिनेश धोंगडे, ज्ञानेश्वर बोराडे, ट्रस्टच्या विश्वस्त करुणा तुपसाखरे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!