इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
नाशिक जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी राबविलेल्या प्रभावी योजना व केलेल्या नेत्रदीपक कामगिरीची केंद्रीय आरोग्य मंत्रालय व केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी दखल घेतली. नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयोजित एका विशेष कार्यक्रमात नाशिकचे जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना विशेष पदक देऊन केंद्रीय आरोग्य मंत्री ना डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
शासनाच्या उद्दिष्टानुसार क्षयरोग निर्मूलनात उल्लेखनीय काम केल्याबद्दल भारत सरकारने चार दिवसापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालय मार्फत घेतलेल्या एका कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याच्या कामगिरीचे कौतुक करून करून सन्मान केला. या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री ना. डॉ हर्षवर्धन तसेच केंद्रीय सचिव राजेश भूषण यांच्या हस्ते जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा इगतपुरीचे तालुका वैद्यकीय डॉ. एम. बी. देशमुख यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांनी केलेल्या कामगिरीचा गौरव केला.
या उपक्रमात जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विभागीय आरोग्य उपसंचालक गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर आदींनी मार्गदर्शन व सहकार्य केले. डॉ. एम. बी. देशमुख यांच्या कामगिरीतून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नाशिक जिल्ह्याचा गौरव केल्याबद्दल सर्वच विभागातून व लोकप्रतिनिधी यांच्याकडून डॉ. देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group