

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृत युवकाची अद्यापही ओळख पटलेली नसून याबाबत घोटी पोलिसानी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. अपघातास कारणीभूत वाहनचालक मात्र फरार झाला.
काल दि. २८ रोजी रात्रीच्या सुमारास मुंबई महामार्गावर ही घटना घडली. मुंढेगाव जिंदाल कंपनीच्या समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात त्या युवकाचा मृत्यू झाला. अपघातात ठार झालेला युवक अनोळखी आहे. वय अंदाजे ३५ अंगात सफेद शर्ट व काळ्या रंगाची नाईट पॅन्ट परिधान केलेली आहे. अपघातात मृत झालेल्या अनोळखी युवकाबाबत कोणाला ओळख अगर माहिती असल्यास घोटी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हवालदार भास्कर महाले यांनी केले आहे.