इगतपुरीनामा न्यूज, दि. 29
मुकणे धरणावर फिरायला गेलेले तीन युवक मुकणे धरणात बुडाले. यापैकी २ युवकांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात पोलिसांना यश आले. त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही घटना आज दुपारी घडली. बुडून मृत पावलेल्या दोघा युवकांची नावे कमलसिंग खरकसिंग बिल्ट ( वय २५ ), मनोजकुमार मोहनचंद्र जोशी ( वय ५१ ) दोघेही रा. उत्तराखंड ह. मु. जिंदाल कंपनी मुंढेगाव अशी असून वाचलेल्या युवकाचे नाव समजले नाही. तिघेही युवक मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील कामगार असल्याचे समजते. ह्या घटनेची माहिती समजताच वाडीवऱ्हे पोलिसांनी जलद वेगाने बचावकार्य केले. नरेंद्राचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रूग्णमित्र निवृत्ती गुंड यांनीही तत्परतेने ह्यावेळी बचावकार्यात भाग घेतला. अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरण परिसरात पर्यटन करण्यासाठी 10 ते 15 युवक आज गेले होते. यापैकी तिघा युवकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यापैकी एकाला वाचवण्यात यश आले. त्या युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. युवकांचा आवाज ऐकून इतरांनी याबाबत वाडीवऱ्हे पोलिसांना माहिती दिली. तातडीने पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. नरेंद्राचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रूग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी साहाय्य केले. दोघा युवकांचा असा बुडून मृत्यू झाल्याची वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबियांवर आकाश कोसळलं. धुलीवंदन सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे जिंदाल कंपनी परिसरात शोककळा पसरली आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास फड आदींनी तपास सुरू केला आहे.
Similar Posts
Leave a Reply
You must be logged in to post a comment.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group