इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
जय किसान फार्मर्स फोरम व आमची माती आमची माणसं कृषी मासिकातर्फे भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारे “कृषिरत्न” हे प्रेरणा पुरस्कार राज्यातील ४० शेतकरी-कृषी उद्योजकांना जाहीर झाले असून २७ डिसेंबरला नाशिक येथील प. सा. नाट्यगृहात सकाळी ११ वाजता पद्मश्री राहीबाई पोपेरे, खासदार सुजय विखे पाटील व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सपत्निक सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय जाधव यांनी दिली.
कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याला मा. खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत, जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, इफकोच्या संचालिका साधना जाधव, मा. कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर, मा. जि. प. अध्यक्षा शालिनीताई पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, कृषी शास्त्रज्ञ डॉ. जयराम पूरकर, कृषिभूषण सदुभाऊ शेळके, डॉ. संतोष जाधव आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये अर्जुन मोतीराम तोरवणे ( महिंदळे, धुळे), माधव सावळीराम खैरे ( हरसूल, नाशिक ), बाळासाहेब यशवंत घोरपडे ( पोगरवाडी,सातारा ), गोरख मुरलीधर पाटील ( गांगवण, कळवण ), ज्ञानदेव सोनबा कोरडे ( सिंगापुर, पुरंदर ), ज्ञानेश्वर पंडितराव पवार ( अमरवेल, धुळे ), निखिल विलास शिंदे (देवरगाव, नाशिक), नितीन चंद्रकांत झगडे ( बारामती, पुणे ), सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप (लासलगाव, नाशिक ), शिवराज रविंद्र मेटकर ( म्हसला, अमरावती ), नामदेव कुशाबा शिंदे ( वनसगाव, निफाड ), रामदास सौदागर खराडे (नगोरली, सोलापूर ), संजय चंद्रभान गावंडे ( सावळी, बुलढाणा ), भिकन लक्ष्मण देवरे ( ओतूर, कळवण ), दिनेश काशिराम दळवी ( चिपळूण, रत्नागिरी ), धनंजय सिताराम बोरसे (कळवण, नाशिक ), ऋषिराज मोहनराव पाटील ( माजगाव, सातारा ), दुल्लभ दयाराम जाधव ( जैताणे, धुळे ), जगन्नाथ दावल माळी ( देवळा, नाशिक ), शशिकांत कांतीलाल तोरडमल ( कर्जत, अहमदनगर ), ज्ञानेश्वर नामदेव सणस ( निरावागज, पुणे ), शांताराम वाळू कमानकर (निफाड, नाशिक ), स्वप्निल प्रल्हाद सुर्यवंशी ( हेळगाव,कराड ), रविंद्र वसंतराव वाबळे ( उगाव, नाशिक ), अशोक भाऊसाहेब देशमुख ( संगमनेर, अहमदनगर ), तानाजी दादाजी देवरे ( बागलाण, नाशिक ), डॉ. नितीन आप्पासाहेब बाबर ( चोपडी, सोलापूर ), आण्णासाहेब मारुती गांगुर्डे ( तीसगांव, नाशिक ), दिनेश राजेंद्र सोळूंके ( अजंदे, मालेगांव ), दादाजी रेवबा जाधव ( पिळकोस, नाशिक ), एकनाथ नाना केदारे (वनसगाव, निफाड ), संदीप माधवराव उफाडे ( नाशिक ), निमसे पाटील अ़ॅग्रो ( श्रीरामपूर, अहमदनगर ), श्रीमंत समृद्धी अ़ॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लि. ( वैजापूर औरंगाबाद ), उत्कर्ष अ़ॅग्रो प्लस इको फार्म प्रा. लि. ( जत, सांगली ), लोहकणे पाटील अ़ॅग्रो प्रोड्यूसर कं. लि. ( डोणगाव, औरंगाबाद ), शामराव सुरेश पगार ( खेडगाव, दिंडोरी ), स्वप्निल रकिबे ( धोडांबे, नाशिक ), महेश माधव वाघ (जोपूळ, नाशिक ), डॉ. सुनिल मोरे ( चांदवड ) यांचा समावेश आहे.
मेडल, ट्रॉफी, फेटा, पैठणी साडी, सन्मानपत्र, डॉ.पंजाबराव देशमुख गौरव विशेषांक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी डॉ. पंजाबरांवांचे जीवनकार्य यावर चर्चा सत्र व आमची माती आमची माणसं कृषी मासिकाच्या “शेतकरी गौरव ” विशेषांकाचे प्रकाशन होणार असून प्रसिद्ध गायिका रेखा महाजन व सुखदा महाजन यांचा शेतकरी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ लामखडे, गोरक्षनाथ जाधव, भगवान खरे, निवृत्ती न्याहारकर, सुनिल निकम, मयुर गऊल, सविता जाधव, शाम गोसावी, वसंत आहेर, शाम खांडबहाले, उत्तम रौंदळ, गणेश पाटील, तुषार वाघुळदे, मिरा भोईर, नाना पाटील, बाळासाहेब मते, पुंजाजी मालुंजकर, गणेश पाटील, संदीप काळे, राजेंद्र धोंडगे, दिनेश भोसले, सुयोग जाधव, शांताराम कमानकर, सुनिल गमे, सुभाष शिंदे, रमेश पाचपिंडे आदिंनी केले आहे.