इगतपुरी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांची ओळख विषयावरील कार्यशाळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व करिअर कट्टा यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांची ओळख या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड  होते. कार्यशाळेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक स्पेक्ट्रम ॲकेडमीचे संचालक प्रा. सुनिल पाटील, श्री. जेजुरकर, वेदिका बिस्वास यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, बँकिग परीक्षा, रेल्वे परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन इत्यादी परीक्षांसाठीची पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम यांची सविस्तर माहिती दिली.

डॉ. पी. आर. भाबड यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. अपूर्वा पाटील  यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी चौधरी यांनी केले. आभार वैभव शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. गोपाळ लायरे, प्रा. डी. के. भेरे, डॉ. के. एम. वाजे, प्रा. जी. डब्ल्यू. गांगुर्डे, प्रा. ए. बी. घोंगडे, प्रा. जी. टी. सानप व विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!