इगतपुरीनामा न्युज, दि. १०
इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा ५ वर स्थिर झालेली आहे. आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार आज २ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. तर आज फक्त २ नव्या व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. आज दिवसअखेर इगतपुरी तालुक्यात ५ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. दरम्यान इगतपुरी तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रांगा लागत आहेत. जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाल्याने नागरिक स्वतःहून लसीकरण करून घेत आहेत.
कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.