इगतपुरीनामा न्यूज – महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभचे उमेदवार लकीभाऊ जाधव अत्यंत लढाऊ आणि सक्षम योद्धा असून सर्वांना सोबत घेऊन ह्या मतदारसंघात मताधिक्याने निवडून येणार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभा होणार आहेत. इगतपुरी मतदारसंघातील मतदारांनी सुद्धा हा गरीबाच्या घरचा तरुण उमेदवार विधानसभेत पाठवण्यासाठी निश्चय केला आहे. या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, इंदिरा काँग्रेस, रिपाई आणि सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मतदारांनीही कोणाच्या भुलथापांना बळी न पडता लकीभाऊ जाधव यांना निवडून देऊन धनाच्या जोरावर सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा असे आवाहन प्रदेश काँग्रेस नेते माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या त्र्यंबकेश्वर येथील संवाद बैठकीत ते बोलत होते. महायुती सरकारच्या कारभारावर आसुड ओढून आ. थोरात यांनी लकीभाऊ जाधव यांना निवडून आणण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचे घोषित केले.
इगतपुरी मतदारसंघाला न भूतो न भविष्यति विकसित करण्याचे स्वप्न घेऊन मी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांतर्फे उमेदवारी करीत आहे. गरिबीचा चटका जवळून अनुभवलेला मी उमेदवार आहे. त्यामुळे मला या सगळ्यांची जाणीव आहे. सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने ह्या निवडणुकीत माझा लढा मोठ्या अर्थशक्तीशी आहे. मात्र जनतेच्या पुण्याईने मी हा लढा यशस्वी करून जिंकून आल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांनी यावेळी केला. राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव उमेश खातळे यांनीही आक्रमकपणे युवकांच्या ताकदीला दाखवून देण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे सांगत युवकांना आणि मतदारसंघाला पुढे नेणाऱ्या लकीभाऊ जाधव यांना निवडून देण्याचे आवाहन केले. काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे यांनीही लकीभाऊ जाधव यांच्याशिवाय आता इगतपुरी मतदारसंघाला पर्याय नसल्याचे अधोरेखित केले. संवाद कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील, काँग्रेस प्रदेश चिटणीस राहूल दिवे, माजी जि. प. सदस्य शिवसेना नेते हरिदास लोहकरे, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार प्रदेश सचिव उमेश खातळे, महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तन्वीर खान, शेकाप जेष्ठ नेते दामोदर पागेरे, युवक जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार विधानसभा अध्यक्ष सुभाष जाधव, युवक अध्यक्ष किरण कातोरे, अल्पसंख्याक सरचिटणीस सत्तार मणियार, मल्हारी गटखळ, निवृत्ती पाटील कातोरे, पाडळीचे चेअरमन विलास धांडे, राष्ट्रवादीचे साहेबराव गायकर, धनंजय राव, वैभव धांडे, बाळा बोन्डे, चंदुशेठ किर्वे, ज्ञानेश्वर खातळे, आदी उपस्थित होते. ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने युवावर्ग आणि जेष्ठ कार्यकर्ते हजर होते.