सेवानिवृत्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे यांच्या माध्यमातून नेहमीच कटिबद्ध : दुर्गाताई तांबे : सेवानिवृत्त सेवक असोसिएशनतर्फे पेन्शनर्स एकात्मता दिन आणि जागतिक पेन्शनर्स दिन संपन्न : कर्तृत्ववान पुरस्कारार्थीना पुरस्कार प्रदान

सुभाष कंकरेज : इगतपुरीनामा न्यूज, दि १७

सेवानिवृत्तांच्या प्रश्नांची मला चांगली जाण असून शासनापर्यंत ते सोडवण्यासाठी निश्चितच कटिबद्ध राहील. जेष्ठ नागरिकांनीही आपल्या समृद्ध अनुभवाचा वारसा समाजासमोर मांडावा. राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेचे आमदार सुधीर तांबे यांच्यामार्फत शासनाकडून सेवानिवृत्तांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रक्रमाने लक्ष घालण्यात येईल असे प्रतिपादन संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई सुधीर तांबे यांनी केले. नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन आयोजित पेन्शनर्स एकात्मता दिन आणि जागतिक पेन्शनर्स दिनाच्या कार्यक्रमात नाशिक येथे त्या बोलत होते. त्या पुढे म्हणाल्या की, निवृत्तीचे जीवन जगताना आपल्या परिवाराला आनंद होईल अशा कामांसाठी वेळ दिल्यास आनंददायी वातावरणाची निर्मिती होईल. सेवनिवृत्त असोसिएशनचे कार्य अतिशय प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याला शतदा सलाम करते असे त्या शेवटी म्हणाल्या.

संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव ( बाबा ) गांगुर्डे  यांनी आपल्या मनोगतात संघटनेची कार्यप्रणाली, निवृत्तांचे प्रश्न आणि पाठपुरावा यांसह कार्याचा धावता आढावा घेतला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नाशिकचे अध्यक्ष दिलीप थेटे, पत्रकार भास्कर सोनवणे, पुजाताई पवार, जगदीश घोडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई सुधीर तांबे होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी श्री. जोंधळे सो, कोषागार अधिकारी एन. एम. शेख सो, इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे, राज्य कर्मचारी संघटना अध्यक्ष दिलीप थेटे, संघटना अध्यक्ष उत्तमबाबा गांगुर्डे, उपाध्यक्ष रविंद्र बापू थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे उपस्थित होते.

ह्यावेळी असोसिएशनचे माजी अध्यक्ष स्व. माधवराव भणगे, निवृत्त स्थापत्य अभियंता स्व. गमनराव देवरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय संघटनेचे राज्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी, नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भामरे, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास गांगुर्डे, सिंचन कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष पी. एस. देव्हारे, नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा पुजा पवार, नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रापं ) रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, इगतपुरीनामाचे मुख्य संपादक भास्कर सोनवणे, सोमनाथ सहाणे, सुनिल माधवराव भणगे, आशिष गमनराव देवरे ह्या कर्तृत्ववान मान्यवरांना “कर्मचारी भूषण प्रेरणा” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव ( बाबा ) गांगुर्डे, उपाध्यक्ष रविंद्र ( बापू ) थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, कोषाध्यक्ष अशोक मानकर, प्रसिध्दी प्रमुख सुभाष कंकरेज ( नाना ), महिला संघटक प्रमुख पुजाताई पवार, बी. एल. पाटील, दिनकर ठाकरे, सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बी. जी. गरड यांनी, प्रास्ताविक मधुकर कांगणे यांनी तर आभार रविंद्र थेटे यांनी मानले. कार्यक्रमाला सुभाष पवार, अरुण पळसकर, रमेश येवले, अरुण मुनशेट्टीवर, बी. एस. शेख, व्ही. पी. पाटील, कल्पना पवार, शोभा विसपुते आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!