रेल्वेमध्ये मौल्यवान दागिने चोरणाऱ्या ३ आरोपींच्या इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या मुसक्या : ५ लाख ३३ हजारांचे दागिने केले हस्तगत

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी ते कसारा दरम्यान कसारा घाटात चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोन्याची दागिन्यांची चोरी करणाऱ्या तीन आरोपींच्या इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्या ताब्यातून ५ लाख ३३ हजार ५१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून उर्वरित दोघांना पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. आरोपींकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेंडगे यांनी व्यक्त केली आहे. लोहमार्ग महाराष्ट्र मुंबईचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, पोलीस अधीक्षक लोहमार्ग पोलीस छत्रपती संभाजी नगर स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय लोहकरे, रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ऋषी शुक्ला, निरीक्षक एस. आर. मीना, प्रधान आरक्षक अक्षय सोये, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक निकम, गोविंद दाभाडे अंमलदार इम्रान कुरेशी, शेडमाके, योगेश पाटील या सर्वांचे गुन्हा उघड करण्यात योगदान लाभले. समीर जनार्दन घोडविंदे वय २० रा. खडवली ता. कल्याण, रोशन अरूण उबाळे वय २३ रा.पंचशिलनगर कसारा हल्ली रा. संभाजीनगर आसनगाव ता. शहापुर, करन भीमराव भालेराव वय १९  सध्या रा. संभाजी नगर आसनगाव ता. शहापुर, मुळ राहणार सोनु बंगला जवळ दिवा ईस्ट ठाणे अशी तिन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.

error: Content is protected !!