कवितांचा मळा : समाजप्रिय व्हायचंय आम्हाला…!

कवयित्री : गीता अनिल शेलार, निवृत्त मुख्याध्यापिका, दादर

कवितांची निवड आणि संकलन साहाय्य : प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार नवनाथ अर्जुन पा. गायकर

माणूस असतो समाजात राहणारा. कधी न एकटे जगणारा
पहिले असते कुटुंब स्वतःचे
आई, बाबा, बहिण भावांचे
दुसरे असते आजी, आजोबा, काका काकीचे
मामा, मामी इतर सर्व भावंडांचे
तिसरे असते शेजारी राहणाऱ्यांचे
आपल्या शिक्षकांचे आणि मित्रांचे
चालणे, बोलणे, ऐकणे यांनी मिळते ज्ञान परिसराचे
धडे मिळती व्यवहाराचे आणि जगण्याचे
हे झाले सर्व सामान्यांचे
पण आम्हा दिव्यांगाचे काय ?
गर्दी फार वाढली जोरात
सारे चालले तोऱ्यात
ज्याला, त्याला जायची घाई
थांबण्यास वेळ नाही
अंध रस्ता ओलांडू पाही
मग आमचे होणार कसे ?
आम्ही समाजशील बनणार कसे ?
कर्णबधीर पाही नजरेने भाव मनातले.
हलणारी तोंडे, हसरे, दुःखी चेहरे
कळत नाही समजत नाही चालले आहे काय ?
बुद्धीला ते समजते, अभिव्यक्तीशी नाते जुळणार कसे ?
आम्ही समाजप्रिय बनणार कसे ?
वाटतं असे धावावे, पर्वत शिखरावरी उंच जावे. आपणही काही करावे, आत्मनिर्भर जगावे
योग्य क्षमतांचा वापर करूनी अडथळे दूर करावे
सहानुभूती नको, आपुलकीने आम्हास जिंकावे
आमच्या जिद्दीला आणि प्रबळ इच्छाशक्तीला समाजाने स्वीकारावे
सामाजिकतेकडे आम्हास यशस्वी करावे.

कवयित्री विजय शिक्षण संस्थेचे कर्णबधिर मुलांसाठी साधना विद्यालय दादर येथील शाळेत गेली ३५ वर्ष कार्यरत असून मुख्याध्यापिका पदावर २२ वर्ष काम करून सेवानिवृत्त झाल्या आहेत. सध्या कार्यकारी मंडळात असून अनेक स्पेशल मुलांशी त्यांचा संबंध आला आहे. त्याअनुषंगाने कवितेची रचना केलेली आहे. 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!