इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – इगतपुरी तालुक्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने समाजाची सेवा करणारे महामार्ग पोलीस आणि महसूल अधिकारी यांचा केलेला सन्मान हा अतिशय बहुमोल स्वरूपाचा आहे. या पत्रकारांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, पोलीस हे निश्चितपणे समाजासाठी चांगले काम उभे करतील असा आशावाद इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इगतपुरी शाखेतर्फे पत्रकार दिनानिमित्त महामार्ग सुरक्षा घोटी टॅब येथे मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा आरसा असुन इगतपुरी तालुक्यातील पत्रकार हे समाजाशी बांधिलकी जपुन काम करतात हे कौतुकास्पद आहे.
महामार्गासह कसारा घाटात मागील वर्षात होणाऱ्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. नियमित होणाऱ्या लहान मोठ्या अपघातात तातडीने मदत कार्य करून महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकारी यासह पोलिसांनी अहोरात्र मदत करून प्रवासी व वाहन चालकांना मार्गदर्शन करीत आपले कर्तव्य बजावले. अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान समाजाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने ” सन्मान सोहळा ” आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन तहसीलदार परमेश्वर कासुळे, प्रमुख पाहूणे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, इगतपुरीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी, पोलीस उपनिरीक्षक सोपान राखुंडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे आर. जी. परदेशी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे आदी मान्यवरांच्या हस्ते महामार्ग पोलीस अधिकारी व कर्तव्यदक्ष महामार्ग सुरक्षा पोलीस यांचा सन्मान करण्यात आला. यात सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवणे, हरी राऊत, माधव पवार, दिनकर बांडे यांच्यासह वाहतुक पोलीस हवालदार हरिश्चंद्र गुजरे, मुरलीधर गायकवाड, संजय क्षीरसागर, सुनिल खताळ, दिपक दिंडे, पोलीस हवालदार ( वायरलेस.) साईनाथ कांगणे, पोलीस नाईक जगदीश जाधव, कैलास गोरे, जितेंद्र पाटोळे, संतोष माळोदे, राहुल गांगुर्डे, अविनाश माळी, सागर जाधव, श्रीराम वारुंगसे, केतन कापसे, रुग्णवाहिका चालक कैलास गतीर, होमगार्ड दोंदे, आहेर, पोटींदे यांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांनी केले. यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे, सरचिटणीस राजेंद्र नेटावटे, उपाध्यक्ष राजु देवळेकर, संघटक सुमित बोधक, सचिव शैलेश पुरोहित, सहसंघटक भास्कर सोनवणे, खजिनदार गणेश घाटकर, कार्याध्यक्ष, वाल्मिक गवांदे, सदस्य संदिप कोतकर, विकास काजळे, एकनाथ शिंदे, समाधान कडवे, सुनिल पहाडीया, लक्ष्मण सोनवणे, शरद धोंगडे, ओंकार गवांदे यांच्यासह जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी किरण फलटणकर, गजानन गोफणे, सुनील कुलकर्णी, रामानंद बर्वे, रमेशसिंग परदेशी, ओमप्रकाश तिवारी, सोनराज चोरडिया, अरविंद चौधरी, के जी विश्वकर्मा, पुरुषोत्तम शिरोळे, कृष्णा शिंदे, पुंडलिक गायकर, प्रकाश नावंदर, शांतीलाल चांडक, ताराचंद भरीडवाल, सतीश मोरवाल, रहीम शाह, सागर परदेशी, आकाश खारके, आकाश पारख, सतीश मोरवाल, मोहनशेठ रावत, गिरीश भुतडा, बिरेन परदेशी, शैलेश शर्मा, संजय बांठिया, योगेश गुप्ता, डॉ. सचिन मुथा, विजय गुप्ता उपस्थित होते. इगतपुरीतील नुतन मराठी शाळा व तहसीलदार कार्यालयात परमेश्वर कासुळे यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांचा सन्मान केला.