
इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
मानवी हक्कांवरील अतिक्रमण, संकट टाळण्यासह कर्तव्य पालनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. मानवी हक्क हे नैसर्गिक हक्क असून त्यावरील संकट टाळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाचे आहे आणि त्याची जोपासना करणे काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भागवत महाले यांनी त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात आयोजित मानवी हक्क दिनानिमित्त बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भागवत महाले, प्रा. संदीप गोसावी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. शरद कांबळे, डॉ. मिलिंद थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना प्रा. भागवत महाले म्हणाले की, आज विश्वात प्रत्येक नागरिकांचे नैसर्गिक हक्क धोक्यात आले आहे. ते जोपासायचे असेल तर स्वतः पासून सुरुवात करणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे. हे हक्क कोणालाही हिरावून घेण्याचा अधिकार नाही. हुकूमशाही सत्तेमुळे हक्काचे उल्लंघन, निर्वासितांचा प्रश्न, अल्पसंख्यांकानावर होणारे अन्याय, अत्याचार थांबवले पाहिजे. मानवाधिकार हे वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, भाषा, धर्म, वय अन्य कोणताही भेदभाव न करता सर्व माणसांसाठी अंतर्भूत हक्क आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीने कर्तव्य सांभाळ केला पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे म्हणाले की जागतिक मानवी हक्क दिन साजरा करण्याची वेळ आपणच आणलीय आहे. व्यक्ती व्यक्ती मधील मान-सन्मान, आदर प्रतिष्ठाही दुरावत असल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. मानवी प्रवृत्तीने आर्थिक लोभापायी इतरांचे अधिकार हिरावले असल्याचे यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रा. संदीप गोसावी, प्रा. डॉ. मिलिंद थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे, सकाळ सत्र प्रमुख प्रा. संदीप गोसावी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. शरद कांबळे, डॉ. मिलिंद थोरात, डॉ. नितीन बोरसे, डॉ.अजित नगरकर, डॉ. अशोक भवर, प्रा. मनोहर जोपळे, प्रा. नीता पुणतांबेकर, प्रा. सुलक्षणा कोळी, प्रा. एस. एस. खाडे, प्रा. ज्ञानेश्वर माळे, प्रा. निलेश म्हरसाळे मयूर कुटे आदींसह प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. मिलिंद थोरात यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप गोसावी केले.