इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इगतपुरी शेतकरी कामगार पक्षाची विस्तारीत बैठक नुकतीच खेडभैरव येथे पार पडली. बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक व पक्षाची भुमिका यावर सविस्तर चर्चा झाली. यात सर्वानुमते जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सर्व जागा स्वबळावर संपूर्ण ताकदी निशी लढण्याचा निर्धार करण्यात आला.
"प्रस्थापित व भांडवलदारी पक्षांना रोखण्यासाठी समविचारी पक्षांची तालुका विकास आघाडी स्थापण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आला आहे. त्यासंबंधी शेतकरी कामगार पक्ष पुढाकार घेणार असल्याचे सुतोवाच शेतकरी कामगार पक्षाचे राज्याचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई संदीप पागेरे यांनी केले आहे व त्यासंबंधी लवकरच इतर पक्षांशी चर्चा करण्यात येणार आहे."
बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक भाई अशोक पगारे यांनी कामकाज पाहीले. बैठकीला इगतपुरी तालुका चिटणीस भाई अरुण भोर, सिन्नर विधानसभा चिटणीस भाई अर्जुन वाजे, इगतपुरी तालुका सहचिटणीस भाई गणपत बोंद्रे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. भाई ॲड. दामोदर पागेरे, भाई अशोक बोराडे, भाई देवराम पाटील शिंदे, भाई अशोक वाजे, खेड उपसरपंच खंडेराव जाधव, माजी उपसरपंच भाई बाळू कचरे, भाई गजीराम वाजे, भाई दिगंबर क्षिरसागर, भाई मेहबूब मणियार, भाई संतोष जाधव, भाई अंबादास वाजे, भाई गोविंद धाडवड, भाई वसंत लहामटे, भाई पंढरी पगारे, भाई अरुण मोजणे, भाई कैलास खराटे, भाई राजाराम वाजे, भाई उत्तम वाजे, भाई संदीप खराटे, भाई दशरथ पागेरे आदी हजर होते.