इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो चौफुलीवर मुंबईला गोमांस घेऊन जाणाऱ्या एका कारमध्ये गोमांस आढळुन आले. १ लाख ६० हजार रुपयाचे ८०० किलो गोमांस व ३ लाख ५० हजार रुपयाची कार असा एकुण ५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नाशिक मुख्यालयाच्या ग्रामीण पथकाने ही कारवाई केली. कार चालकाविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पिंप्रीसदो फाट्या जवळ रोज मध्यरात्रीच्या सुमारास गोंमासाची चोरटी वाहतुक होत असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयातील पथक रविवारी मध्यरात्री गस्त घालीत होते. यावेळी सफेद रंगाची मारुती एसएक्स 4 कार क्रमांक MH 02 BG 5590 या कारच्या झडतीत ८०० किलो गोमांस आढळुन आले. या बाबत कारचालक समीर मेहमुद शेख, वय ३८ वर्ष, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गोवंडी मुंबई याच्याकडे चौकशी केली असता जनावरांचे मांस वाहतुकीचा पशुवैद्यकीय अधिकारीचा दाखला तसेच संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांचा दाखला नसल्याचे आढळुन आले. म्हणून संबंधित चालकाला कलम 269 व 429 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करून सुमारे ५ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस शिपाई उमेश खालकर यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन पुढील तपास सुरु आहे.