पाडळी देशमुख जवळ अपघातात ओझरचे तिघे जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

मुंबई आग्रा महामार्गावरील पाडळी देशमुख जवळ झालेल्या अपघातात ३ जण जखमी झाले. यापैकी १ जण गंभीर जखमी झालेला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात आज सायंकाळी ७ च्या दरम्यान घडला. तिघेही जखमी ओझर येथील असल्याचे समजते. नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी वेळेत पोहोचून जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव बचावला.

सुनील तुकाराम काळभोर वय 59, सुनिता सुनील काळभोर वय 43, धिरज सुनील काळभोर वय 26 सर्व रा. पंचवन नगर ओझर जि. नाशिक हे MH 15 FT 0061 ह्या वाहनाने नाशिककडून मुंबईच्या दिशेने जात होते. आज सायंकाळी ७ च्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामध्ये 1 जण गंभीर तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने जखमींना रुग्णवाहिकेतून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू झाले असून नरेन्द्राचार्य रुग्णवाहिकेमुळे जखमींचा प्राण वाचला. वाडीवऱ्हे पोलिसांनी ह्याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!