
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – घोटी येथील बालाजी मित्र मंडळाने श्री स्वामी समर्थ प्रगटदिन उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री स्वामी समर्थ जयंती उत्सवाचे हे १६ वे वर्ष असून मोठ्या उत्साहाने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करीत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी हभप विजय महाराज चव्हाण यांचा हरिपाठाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर हभप प्रतीक्षा जाधव ( गिरमकर शिर्डी ) यांचे हरिकीर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी श्री बालाजी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर नाना भगत, अध्यक्ष रोहित म्हसणे, उपाध्यक्ष महेश चव्हाण, खजिनदार हर्षद भोर, सरचिटणीस किरण वेल्हाळ, मंडळाचे सदस्य व मारुती मंदिर ट्रस्ट, समस्त गावकरी मंडळी घोटी आदींनी विशेष परिश्रम घेतले..