आरसीई एज्युकेशनचे रवींद्र पाटील गोदागौरव पुरस्काराने सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्याचे कार्य रविंद्र पाटील करत असतात. त्यांना राष्ट्रसंत श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री राजे छत्रपती सामाजिक शैक्षणिक संस्था, संत गाडगे महाराज नागरी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणार्‍या कर्मयोगी निवृत्ती बर्वे गोदागौरव पुरस्काराने आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ताजी गायकवाड, शिव सहकार सेनेच्या अध्यक्षा शिल्पा सरपोतदार उपस्थित  होत्या. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे दत्तुजी बोडके, श्याम गोसावी, मराठी एकीकरण समितीचे वैभव देशमुख, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबलु मिर्झा, शहराध्यक्ष ललित पवार, रवींद्र टिळे, पंकज सूर्यवंशी, संजय पोरजे, दत्ता कांगणे, संतोष मानकर, रोहित पारख, मनीष महाजन, अंकुश चिंचोरे, तुषार सोनवणे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!