नाशकात ऑक्सिजन प्लाँटसाठी ‘क्लस्टर योजना’ राबवण्याची डॉक्टर संघटनेची खासदारांकडे यांच्याकडे मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
कोरोना संसर्ग आजाराच्या वाढत्या उद्रेकात बाधित रुग्णांवर उपचारादरम्यान ऑक्सिजन पुरवठ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजन तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना आपल्या प्राणाला मुकावे लागत असल्याने रुग्णांचे नातेवाईक रुग्णालय प्रशासनावर रोष व्यक्त करीत आहेत. यामुळे डॉक्टरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागपूरच्या धर्तीवर नाशकात ऑक्सिजन प्लाँटसाठी ‘कस्टर योजना’ राबवावी, अशी आग्रही मागणी डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे केली आहे. ऑक्सिजन प्लाँटच्या क्लस्टर योजनेमुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार असल्याचा विश्वास यावेळी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी खा. गोडसे यांच्याकडे व्यक्त केला.

नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे. खासदार गोडसे यांनी ऑक्सिजनच्या पुरेसा पुरवठ्यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन नाशिकला होणारा ऑक्सिजन पुरवठ्याचा कोठा वाढवून घेतला आहे. तसेच ऑक्सिजनची समस्या हलकी करण्यासाठी खा. गोडसे यांनी विविध संघटनांच्या मदतीने सिन्नर, गिरणारे याठिकाणी स्वंयमनिर्मित ऑक्सिजन प्लाँटची निमिर्ती केली आहे. मात्र तरीही जिल्ह्यात ऑक्सिजन तुटवड्याची समस्या कायम आहे. ऑक्सिजन तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत असल्याने रुग्णालय प्रशासनाला रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरातील रुग्णालय प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आणि ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी नुकतीच शहरातील डॉक्टराच्या आयएमए या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खा. गोडसे यांची भेट घेतली. यावेळी ऑक्सिजन तुटवड्यामुळे भेडसाविणाऱ्या समस्यांच्या जंत्रीचा पाढा आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी खा. गोडसे यांच्या समोर माडला. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी नागपूरच्या धर्तीवर नाशकात ऑक्सिजन प्लाँटसाठी ‘कस्टर योजना’ राबवावी, अशी आग्रही मागणी डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खा. गोडसे यांच्याकडे केली. यावेळी आयएमएचे अध्यक्ष हेमंत सोननीस यांच्यासह  डॉ. कविता गाडेकर, डॉ. विशाल पवार, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. उमेश नागापूरकर, डॉ. राजश्री पाटील, डॉ. पंकज भदाणे, डॉ. किरण शिंदे आदी डॉक्टर उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!