समता शिक्षक परिषदेचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार घोषित : जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांची माहिती

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी २८ नोव्हेंबर या दिवशी मागील ३० वर्षांपासून महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद समतेचा जागर करीत आहे. त्यांच्या वतीने जिल्हाभरातील आदिवासी पाडा, वाडी-वस्ती, दऱ्याखोऱ्यात ज्ञान दानाचे  काम करणाऱ्या शिक्षकांना ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षी उद्या रविवारी २८ नोव्हेंबरला नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राज्याच्या शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड व ‘माणुसकीची शाळा’ या उपक्रमाचे प्रणेते शाहीर संभाजी भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी होणाऱ्या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड हे असणार आहेत.

शाहीर संभाजी भगत हे ‘माणुसकीची शाळा’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत तर तृतियपंथीयांसठी विशेष कार्य करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विशेष निमंत्रीत जयश्री खरे ( बागुल )यांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तर कोरोना कालावधीत समाज प्रबोधन व विद्यार्थीनींच्या आरोग्या बाबत  जनजागृती करणाऱ्या नन्ही कली उपक्रमाच्या जिल्हा समन्वयक अर्चना मारगोनवार यांचा  विशेष सत्कार होणार आहे असे समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, जिल्हा सरचिटणीस संजय कुमार पगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
या कार्यक्रमाचे स्वरूप सन्मानचिन्ह, उद्बोधनपर ग्रंथ व मानपत्र असे असणार आहे.

गुणवंत शिक्षक पुरस्कार पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे
विशेष पुरस्कार – प्रा. जयश्री खरे बागुल ( नाशिक ), अर्चना मारगोनवार ( समन्वयक नन्ही कली ), जिल्हा स्तरीय पुरस्कार – केदार सुखदेव निकम ( मालेगाव ), नलिनी बन्सीलाल अहिरे ( निफाड ), अमिता रत्नाकर सोनवणे ( दिंडोरी ), सुरेश हिरामण  ठाकरे ( सटाणा ), सुनील मधुकर बोंडे ( मनपा नाशिक ), जितेंद्र मोतीराम अहिरे ( इगतपुरी ), सुवर्णा शामराव देवरे ( देवळा ), अंजना नामदेव बहिरम ( कळवण ), कल्पना देवराम ब्राम्हणे ( मालेगाव ), रमेश आधार पाटील ( त्र्यंबक ), सविता नारायण नेहे उगले ( सिन्नर ), खान मन्सूर मेहबूब ( चांदवड ), देवदत्त हरी चौधरी ( पेठ ), गजानन निवृत्तीराव देवकते ( येवला ), फेरोज निजामुद्दीन शेख ( सुरगाणा ), छाया नामदेव माळी ( मनपा नाशिक ), योगेश सुरेशराव साळवे ( नांदगाव ), नवनाथ छबू खरे ( निफाड )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!