उल्लेखनीय काम करणाऱ्या ६ जणांना आविष्कार फाउंडेशनचा पुरस्कार : त्र्यंबकेश्वरला उद्या होणार सन्मान समारोह

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

कोल्हापुर येथील आविष्कार फाउंडेशन इंडिया नाशिक जिल्हा शाखेतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. 2021 चा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, माजी सैनिक विजय कातोरे, माणिकखांबचे माजी सरपंच हरीष चव्हाण, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार मोडाळेच्या शिक्षिका माधुरी पाटील-शेवाळे, आदर्श ग्रामसेविका पुरस्कार हर्षिता पिळोदेकर, उत्कृष्ट पत्रकार कार्यगौरव पुरस्कार इगतपुरी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विक्रम पासलकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभ उद्या दि. 28 ला त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे

या कार्यक्रमात राज्यभरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या  विविध 46 जणांना पुरस्कार देवून विशेष गुणगौरव करण्यात येणार आहे अशी माहिती आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक संजय पवार, नाशिक जिल्हाध्यक्ष नारायण गडाख यांनी दिली. कार्यक्रमाला खासदार हेमंत गोडसे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम, निमाचे संचालक राजेश गडाख, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम, आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक संजय पवार, नाशिक विभागीय अध्यक्ष राममूर्ती रायसिंग आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आविष्कार फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!