निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
खंबाळे, कुऱ्हेगाव, पिंप्री सद्रोद्दीन, धार्नोली, बोर्ली, चिंचलखैरे, आवळखेड, आडवण, टाकेघोटी, नांदगाव सदो, बोरटेंभे, पिंपळगाव मोर, आहुर्ली, तळोशी, टाकेद बुद्रुक, वाकी, नांदूरवैद्य, खेड, सोनोशी, शिरसाठे, कुशेगाव, बलायदुरी, कुर्णोली, फांगुळगव्हाण, मुरंबी, उभाडे, पाडळी देशमुख, वाडीवऱ्हे ह्या गावांत ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक होणार आहे. कोरोना महामारीच्या लॉकडाऊननंतर सगळी व्यवस्था पूर्ववत होत आहेत. अलीकडेच राज्यातल्या जागा रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच सहकारी संस्था व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका देखील जाहीर झाला आहेत.
ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका याआधीच होऊन गेल्या होत्या त्या ग्रामपंचायतीमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे, सदस्य अपात्रता, निधन, राजीनामा व अविश्वास आदी कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम गत आठवड्यात होऊन अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. होऊ घातलेल्या पोटनिवडणुकांनी गावपातळीवरील राजकारण चांगलेच ढवळून निघणार आहे. रिक्त जागांमुळे अल्पमतात येणारी सत्ता तसेच अविश्वास ठरावाची परिस्थिती काहींना तारक तर काहींना मारक ठरणार आहे. पोटनिवडणुकीत सत्ता कोणाच्या पारड्यात पडते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. पिंपळगाव मोर, वाकी, शिरसाठे, उभाडे, पाडळी देशमुख येथील ओबीसींच्या जागा सर्वसाधारण झाल्या आहेत.