
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ – घोटी येथील आदर्श कन्या विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना पाडळी देशमुख गावकरी यांच्या हस्ते क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने सॅन्सन कंपनीतर्फे संचालक सुनिल जाधव, राजेंद्र जाधव यांच्यामार्फत संचालक शुभम जाधव यांनी हे वाटप केले. कंपनीतर्फे पाडळी देशमुख ग्रामस्थांकडे शालेय साहित्य सुपूर्द करण्यात आले होते. त्या साहित्याचा शालेय विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा या उदात्त हेतुने लेझीम, क्रिकेट साहित्य, भाला, बॅडमिंटन साहित्य यासह क्रीडा साहित्य विद्यार्थिनींना वाटप झाले. कंपनीचे संचालक शुभम जाधव, पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, ठकाजी धांडे, फकिरराव धांडे, माजी सरपंच जयराम धांडे, सोमनाथ चारस्कर, ज्ञानेश्वर बोराडे, शुभम जाधव आदींच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम झाला. कन्या शाळेच्या प्रांगणात झालेल्या वाटप कार्यक्रमाप्रसंगी शिक्षकवृंद, विद्यार्थी व पाडळी देशमुखचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या धाडसवाढीसाठी उपक्रम राबवल्याबद्धल मुख्याध्यापिका कल्पना सोनवणे यांनी आभार मानले.