
त्र्यंबकेश्वर येथे १५ तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न
ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी पाहता काँग्रेसला येत्या काळात अच्छे दिन येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने तन मन धनासह तळमळीने प्रचारात उतरावे असे प्रतिपादन राज्याचे महसुल मंत्री तथा काँग्रेसचे नेते ना. बाळासाहेब थोरात यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत तालुका निहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. बाळासाहेब थोरात बोलत होते.
नाशिक जिल्ह्यातील एकमेव काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी गत दोन वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार हिरामण खोसकर, सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, राजाराम पानगव्हाणे, संपतराव सकाळे, संदीप गुळवे, जयप्रकाश छाजेड, मुरलीधर पाटील, जनार्दन माळी, जयराम धांडे, सभापती मोतीराम दिवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, मिथुन राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे काँग्रेसचा गौरव करतांना आपल्या भाषणात म्हणाल्या की, काँग्रेसचा कार्यकर्ता हाच खरा देशाचा कार्यकर्ता होय. देशाची राष्ट्रीयता आणि अखंडता फक्त काँग्रेसमुळे टिकली आहे. काँग्रेसला जवळपास 140 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे राष्ट्रीयत्व जपणारा एकमेव काँग्रेस पक्षच आहे. भाजपला त्यांची जागा दाखवुन द्या असे त्या म्हणाल्या. त्यानंतर महसुलमंत्र्यांनी आपल्या भाषणात मोठी गर्दी पाहुन आजचे चित्र पाहता काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. पण नेमके मतदान झाल्यावर आपले माणसे का निवडुन येत नाहीत हा प्रश्न आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषदामध्ये काँग्रेसला जागा जास्त आल्या. त्यामुळे सध्या तरी काँग्रेसचे वातावरण चांगले आहे. यावेळी जिल्हाभरातील 15 तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. सर्वात अगोदर त्र्यंबकेश्वर तालुक्याचा आढावा घेणे सुरु करण्यात आले. या आढावा बैठकीसाठी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, निफाड, कळवण, सटाणा, येवला, नांदगाव, नाशिक, सिन्नर, देवळा आदी तालुक्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मधुकर लांडे , पांडुरंग मामा शिंदे, मिथुन राऊत, दिलीप मुळाणे, त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष बाळासाहेब कदम, दिनकर मोरे, राजेंद्र बदादे, दिनेश तथा राजाबाबु पाटील, सुनिल मोरे, निवृत्ती महाले, यशवंत महाले, राजाराम बदादे, सागर चव्हाण, राजाराम चव्हाण, सुरेश चव्हाण, भावडु बोडके, राजु बोडके, नाना कसबे, बाळासाहेब बोडके, रोहिदास बोडके, रावजी दिवे, जिल्हा परिषद सदस्य शकुंतला डगळे, पंचायत समिती सदस्या अलका झोले मधुकर झोलेआदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
