इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
राज्यात महाविकास आघाडीत सहभागी असलो तरी आपल्याला आगामी काळात निवडणुकांना सामोरे जाताना स्वबळावर लढण्याची तयारी आणि सज्जता ठेवायला लागेल. निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी शिवसैनिकांकडून सज्जता राखावी. इगतपुरी मतदारसंघ ह्या राज्याच्या प्रवेशद्वारावर आगामी काळात शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने झळकला पाहिजे. इगतपुरीमध्ये यापुढे फक्त आणि फक्त शिवसेनेचा आमदार असणार आहे असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी घोटी येथे व्यक्त केला.
खा. राऊत यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, शिवसेना ही सर्वांची आई असल्याने शिवसेना शाखांच्या माध्यमातून शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या प्रश्नांना वाहून घ्यावे. ५० वर्षात सर्वांना शिवसेना शाखेचे आकर्षण आहे. सेनेची शाखा ही मंदिर आणि न्याय मंदिर बनली असल्याने लोकांच्या समस्या याठिकाणी सोडवून लोकांना आधार वाटत आहे. मुख्यमंत्री सेनेचा असल्याचा सुद्धा लोकांना मोठा आधार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा उल्लेख आपल्या भाषणात करतांना त्यांच्यावर राज्यपाल महोदयांचे विशेष प्रेम असल्याने ते भावी आमदार असल्याची कोटी त्यांनी केली.
इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घघाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. संजय राऊत यांनीं इगतपुरी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला.
मध्यवर्ती संपर्क कार्यालयाच्या उद्घघाटन प्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार निर्मला गावित, काशीनाथ मेंगाळ, राजाभाऊ वाजे, पांडुरंग गांगड, माजी आयुक्त चंद्रकांत खाडे, जिल्हा परिषद सभापती सुशिला मेंगाळ, रिटा वाघ, उदय सांगळे, जि. प. सदस्य नयना गावित, कावजी ठाकरे, हरिदास लोहकरे, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, जेष्ठ नेते रमेश गावित, सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे, सरपंच अनिल भोपे, उपसरपंच रामदास भोर, सदस्य संजय आरोटे, रघुनाथ तोकडे, युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, समाधान वारुंगसे, व्यंकटेश भागडे, डायमंड कडु, उपसरपंच सतीश गव्हाणे, शहरप्रमुख गणेश काळे, हरिभाऊ वाजे, देविदास जाधव, महिला उपतालुकाप्रमुख स्वाती कडु, मथुरा जाधव, बाळा गव्हाणे, सुनिल जाधव, सुर्यकांत भागडे, रमेश धांडे, अशोक सुरुडे, नंदलाल भागडे, रंगनाथ कचरे आदी उपस्थित होते.